Lionel Messi: फुटबाॅलचा बेताज बादशाह अर्जेंटिनाचा विश्विविजेता कॅप्टन लिओनेल मेस्सीने यादगार भारत दौरा केला. तब्बल 14 वर्षांनी तो भारत दौऱ्यावर आला. यावेळी त्याचे कोलकाता, हैदराबाद, मुंबई, दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी स्टेडियमध्ये गर्दी केली. दौऱ्यानंतर मेस्सीने व्हिडिओ शेअर करत आभार मानले आहेत. मेस्सीने 'नमस्ते भारत!' म्हणत आपला दौरा दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथे खूप छान झाला, असे नमूद केले. त्याने आपल्या दौऱ्यादरम्यान केलेल्या यादगार स्वागतासाठी, उत्कृष्ट आदरातिथ्याबद्दल आणि दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल आभार मानले आणि भारतातील फुटबॉलचे भविष्य उज्ज्वल असेल, अशी आशा व्यक्त केली.
मेस्सीकडून राजकारण्यांना कीक
दरम्यान, मेस्सीने शेअर केलेल्या व्हिडिओत भारतातील कोणत्याच राजकारण्याला संधी दिलेली नाही. त्याच्या व्हिडिओत केवळ करिना कपूर, सचिन तेंडुलकर आणि उद्योगपती संजीव गोयंका दिसून आले आहेत. मेस्सीच्या या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची मुले तैमूर अली खान आणि जेह अली खान यांचा समावेश होता. करीना कपूर खान आणि तिच्या मुलांनी या भारत दौऱ्यात मेस्सीची भेट घेतली होती.
करीनाने मेस्सीचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पुन्हा शेअर केला आणि आनंद व्यक्त केला,. "Ok Tim, then this happened for you" असे उद्गार तिने काढले आणि सोबत हर्ट इमोजी देखील जोडले. या टूरदरम्यान मेस्सीला बॉलिवूड सेलिब्रिटीचे स्वागत केले. शाहरुख खान (SRK) आणि त्याचा मुलगा अबराम तसेच शिल्पा शेट्टी, अजय देवगण आणि शाहिद कपूर यांनीही या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला होता.
शाहरुख खानकडून जोरदार स्वागत
मेस्सीच्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खानसोबत झालेल्या भेटीचा समावेश नव्हता. मात्र, मेस्सी आणि शाहरुख खान यांच्या भेटीचे क्लिप्स दौऱ्यातील प्रमुख क्षण होते. शाहरुख खानने मेस्सीचे हँडशेक आणि स्माईलसह स्वागत केले होते. तसेच, शाहरुख खानचा मुलगा अबराम खान, मेस्सीमुळे खूप भारावून गेला होता. मेस्सीचे इंटर मियामीचे (Inter Miami) संघसहकारी लुईस सुआरेझ (Luis Suárez) आणि रॉड्रिगो डी पॉल (Rodrigo De Paul) यांनी देखील शाहरुख खानचे स्वागत केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या