IPL 2026 Auction Mumbai Indians: आयपीएल 2026 च्या लिलावात (IPL 2026 Auction) सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) ठरला. कॅमेरॉन ग्रीनला केकेआरने 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले. कॅमेरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू देखील बनला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. 2023 मध्ये ग्रीनला 17.50 कोटी रुपयांमध्ये आरसीबीने खरेदी केले होते.

Continues below advertisement

26 वर्षीय कॅमेरॉन ग्रीनने 2013 मध्ये आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण केले. त्या हंगामात, कॅमेरॉन ग्रीनने मुंबई इंडियन्ससाठी 16 सामन्यांमध्ये 452 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये, कॅमेरॉन ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला. गेल्या हंगामात कॅमेरॉन ग्रीन 13 सामन्यांमध्ये 255 धावा केल्या आणि 10 विकेट्स पटकावल्या. कोलकाता नाईट रायडर्स कॅमेरॉन ग्रीनचा आता तिसरा आयपीएल संघ ठरला आहे. (Mumbai Indians First Bid Cameron Green )

खिशात पैसे कमी असतानाही मुंबईने कॅमेरॉन ग्रीनवर पहिली बोली लावली- (First bid Cameron Green)

यंदा मुंबईचा संघ लिलावात सर्वात कमी 3 कोटींपेक्षाही कमी पैसे घेऊन आला होता. लिलावाआधी मुंबईने ट्रेड डील करत तीन खेळाडूंना संघात दाखल करुन घेतले होते. त्यासोबत त्यांनी तब्बल 17 खेळाडूंना रिटेन केले. त्यामुळे लिलावात उतरताना त्यांच्याकडे फारसे पैसे शिल्लक नव्हते. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी लिलावात एक कृती केली, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. पर्समध्ये पैसे नसतानाही कॅमेरॉन ग्रीनवर पहिली बोली लावली. मुंबईच्या या कृतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र यामागचं खरं कारण आकाश अंबानी यांनी लिलावादरम्यानच्या मुलाखतीत सांगितलं.

Continues below advertisement

आकाश अंबानी नेमकं काय म्हणाले? (Akash Ambani Mumbai Indians)

कॅमेरॉन ग्रीन हा उत्तम खेळाडू आहे. त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्याच संघातून आणले. तो फक्त चांगला क्रिकेटपटू नाहीय, तर खूप चांगला माणूसही आहे. कॅमेरॉन ग्रीनला आम्ही विकत घेऊ शकत नव्हतो, याबाबत आम्हाला पूर्णपणे कल्पना होती. परंतु कॅमेरॉन ग्रीनविषयी आमच्या मनात आदर आहे. तो आदर दाखवण्यासाठीच आम्ही लिलावात कॅमेरॉन ग्रीनवर पहिली बोली लावली, असं मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी सांगितले. 

आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-(IPL 2026 MI Full Squad)

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघू शर्मा, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जैक, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत.

संबंधित बातमी:

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI