Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ठाणे, कल्याण-डोंबोली, पुणे, नाशिक इथे सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे आणि येत्या एक-दोन दिवसांमध्ये या सगळ्याची घोषणा होईल, अशी माहिती सुद्धा राऊत यांनी दिली. राऊत म्हणाले की, मुंबई ही महत्त्वाची आहे. कालसुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेची नेतेमंडळी अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा, अशी आमची अपेक्षा आहे. 

Continues below advertisement

आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही (Sanjay Raut on BMC Election)

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडीच सत्ताधारांसमोर आव्हान उभं करेल आणि महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत ना? पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेले, चर्चेला बसले. युती जाहीर करण्यासाठी एक शक्ती प्रदर्शन नक्की होईल. जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल, तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल याची मला खात्री आहे.उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील. ती महाराष्ट्राची गरज आहे. जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावे आणि लोकांना संबोधित करावे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

तुम्ही अमित शाहांची टेस्टट्यूब बेबी आहात (Sanjay Raut on Eknath Shinde) 

त्यांनी पुढे सांगितले की, प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्कवर व्हावी, ही सगळ्याच पक्षांची इच्छा आहे. पण यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली. शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे? त्यांना अमित शाहांनी पक्ष ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शाहांची टेस्टट्यूब बेबी आहात, तुमचा नॅचरल जन्म नाही. चुनाव आयोगचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे, त्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका. आम्ही (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी जी आहे, ती नैतिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या योग्य असल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

पा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका (Sanjay Raut on BJP)

संजय राऊत म्हणाले की, एनसीपी अजित पवार गटाचे मुंबईचे नेतृत्व नवाब मलिक करत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी त्यांना महायुतीत मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. संजय राऊत म्हणाले की, हे ढोंगी आहेत. जसा शिंदेंचा पक्ष डुप्लिकेट आहे, तसा हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे. नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी आणि बैठका होत आहेत. नवाब मलिक यांची एक कन्या सत्ताधारी पक्षात आहे. कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका, असे राऊत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या