जाडेजाला सिंहासोबतचा सेल्फी पडला महागात; 20,000 दंड
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2016 05:47 PM (IST)
अहमदाबाद: भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला सिंहांसोबत सेल्फीप्रकरणी गुजरातच्या वनविभागानं वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाडेजा सध्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजमध्ये असल्यानं त्याचे सासरे हरदेवसिंग सोळंकी यांनी त्याच्या वतीनं दंड भरल्याची माहिती वनविभागानं दिली आहे. जाडेजासोबतच अभयारण्यातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. जून महिन्यात जाडेजानं त्याची पत्नी रिवासह जुनागडच्या गीर अभयारण्याला भेट दिली होती. अभयारण्यात दोघांनी गाडीतून खाली उतरून सिंहांसोबत फोटो काढले होते. पण वनविभागाच्या नियमांनुसार अभयारण्यात पर्यटकांना गाडीतून खाली उतरण्यास मनाई आहे.