मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा सेमीफायनचा महामुकाबला न्यूझीलंडविरुद्ध होत आहे. हिटमॅन रोहितने टाॅस जिंकल्यानंतर मैदानात अक्षरश: तांडव सुरु केले. त्यामुळे न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी अवघ्या पाच षटकांमध्येच पळाले. रोहतने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवताना चौकार आणि षटकारांची बरसात केली. त्याने अवघ्या 29 चेंडूत 4 चौकार आणि चार षटकारांचा पाऊस पाडत धमाकेदार सुरुवात करून दिली.






तुफानी फलंदाजी करणारा रोहित षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. रोहित शर्मा 29 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. 






किवी कर्णधार केन विल्यमसनने रोहित शर्माचा अप्रतिम झेल घेतला. समालोचक मोहम्मद कैफने विल्यमसनच्या झेलचे खूप कौतुक केले.






रोहित 47 धावांवर बाद झाल्यानंतर गिल न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर तुटून पडला. शुभमन गिलने मनगट कौशल्य दाखवत चौकारांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे रोहित बाद झाल्यानंतरही भारताच्या धावांचा वेग कमी झालेला नाही. 15 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर 118 झाली आहे. गिलने 41 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. गिलने आक्रमक पवित्रा धारण करताच कॅमेरा सारा तेंडुलकरकडे जाऊन पोहोचला. 






रोहित बाद झाल्यानंतर शुबमन गिलने झटपट धावा काढण्याची जबाबदारी घेतली. 10व्या षटकात गिलने लॉकी फर्ग्युसनवर दोन चौकार मारले. दुसरीकडे, विराट कोहली 9व्या षटकात टीम साऊथीच्या चेंडूवर थोडक्यात हुकला. न्यूझीलंडने LBW साठी अपील केले होते, पण अंपायरने नॉट आऊट दिला होते. त्यानंतर किवी कर्णधार केन विल्यमसनने डीआरएस घेतला. मात्र, बॅटला आदळल्यानंतर चेंडू पॅडला लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. अशा प्रकारे कोहली नाबाद राहिला. यावेळी अनुष्काने हात जोडल्याचे दिसून आले. 






इतर महत्वाच्या बातम्या