मुंबई : ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारला. यानंतर कॅप्टन कूल धोनीने ज्यापद्धतीने उत्तर दिलं, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. धोनीने त्या पत्रकारला बोलावून त्यालाच प्रश्न विचारुन फिरकी घेतली.

 

मात्र या घटनेनंतर आता पत्रकाराने त्याची बाजू मांडली आहे. सॅम्युअल फेरिस असं या पत्रकाराचं नाव असून तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या cricket.com.au या वेबसाईटचा पत्रकार आहे.

 

पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार धोनीसह झालेल्या बातचीतनंतर सॅम्युअल फेरिसने cricket.com.au वर एक लेख लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, निवृत्तीचा प्रश्न ठरवून विचारला नव्हता.

 

निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीकडून पत्रकाराची शाळा!


 

का विचारला निवृत्तीचा प्रश्न?

मला वाटलं धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ज्याप्रकारने आश्चर्याचा धक्का दिला होता, तसाच धक्का तो यावेळीही देऊ शकतो. त्याने कारकीर्दीत सगळं मिळवलं आहे. भारतीय मीडियाने विचारलं नाही म्हणून मी निवृत्तीचा प्रश्न विचारला.




यंग टॅलेण्टला संधी


तो अजूनही फलंदाजी करत आहे. त्याची विकेट कीपिंगही चांगली आहे. पण तो 34 वर्षांचा आहे. विराट आता त्याला रिप्लेस करु शकतो. त्यामुळे त्याला आता आता यंग टॅलेण्टला संधी द्यायला हवी.

 

रात्रभर त्रस्त होतो

या घटनेनंतर सोशल मीडियावर मी ट्रेण्डिंगमध्ये होतो. अनेक जण निगेटिव्ह कमेंट्स करत आहेत. यामुळे मी रात्रभर त्रस्त होतो.

 

धोनी उत्तरासाठी तयार होता

हा प्रश्न आधी भारतीय मीडिया विचारत असे, पण यावेळी मी विचारला. भारतीय मीडियाने प्रश्न विचारला असता, तर धोनी कदाचित चिडला असता. तो या प्रश्नासाठी तयार होता, असं वाटत होतं.  जणू काही भारतीय पत्रकार मित्रांवर आलेली गोळी मी माझ्यावर झेलली.

 

सॅम्युअल फेरिसने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात 2011 मध्ये बिग बॅश लीगचा पत्रकार म्हणून केली होती. तो सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसंबंधित बातम्यांचं कव्हरेज करतो.

 

पाहा व्हिडीओ