पंकजा मुंडेंनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाचं दर्शन घेतलं
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2016 11:46 AM (IST)
बीड : एकीकडे शनीशिंगणापूरमध्ये राडा सुरु असताना दुसरीकडे पाथर्डीमध्ये महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाला तेल वाहिलं. महिलांना मंदिरामध्ये प्रवेश द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी पाथर्डीमधल्या शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं आहे. https://twitter.com/Pankajamunde/status/716182370009874432 शनीशिंगणापूरप्रमाणे याठिकाणी महिलांना चौथऱ्यावर जाण्यासाठी बंदी नव्हती. पण महिला चौथऱ्याच्या खाली उभ्या राहूनच शनिदेवाचं दर्शन घ्यायच्या. मात्र आज पंकजा मुंडे यांनी पाथर्डीमधील शनी मंदिरात चौथऱ्यावर जाऊन शनी देवाला तेल वाहिलं. संबंधित बातम्या