मुंबई: जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आपल्या सर्वात स्वस्त कार मॉडेल 3सह भारतीय बाजारात एंट्री करणार आहे. या कारसाठी कंपनीने प्री ऑर्डरही सुरु केलं आहे. या कारचं उत्पादन 2017च्या शेवटी सुरु होणार असून याची डिलिव्हरी 2018 पासून होणार आहे.
ही कार अवघ्या 1000 डॉलरमध्ये (जवळजवळ 66,300) बुक करता येणार आहे. भारतात कार लाँचिंगसह आपलं इंफ्रस्ट्रक्चरही भारतात सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.
कॅलिफोर्नियातील एका इव्हेंटमध्ये मॉडेल 3चं मॉडेल प्रदर्शित करण्यात आलं. याची किंमत जवळजवळ 35,000 डॉलर (जवळजवळ 23लाख) असणार आहे. कंपनी या कार अमेरिकेत तयार करणार आहे. भारतात ही कार आणखी महाग होऊ शकते. कारण की, निर्यातीमुळे या कारवर बराच टॅक्स लागू शकतो.
ही कार कशी बुक कराल?
मॉडेल3 च्या बुकींगसाठी tesla.com वेबसाइटवर लॉग इन करुन आपली आवडती कार बुकींग सिलेक्ट करुन त्याबाबत माहिती द्यावी. या कारच्या बुकींगीसाठी आपण कार्ड पेमेंट कुरु शकतात. तसेच उर्वरित रक्कम कार डिलिव्हरी वेळेस द्यायची आहे.
जगातील जबरदस्त इलेक्ट्रिक कारची आता भारतात एंट्री!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2016 11:10 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -