सानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो अत्यंत गोड आहे. फोटोमध्ये एक मोठा वॉर्डरोब आहे. डावीकडील टीशर्टवर मिर्झा लिहिलं आहे, तर उजवीकडे असलेल्या टीशर्टवर मलिक लिहिलं आहे.
वॉर्डरोबच्या मध्यभागी असलेल्या खणात लहान बाळाचे छोटेसे कपडे आहेत. त्यावर मिर्झा मलिक लिहिलं आहे.
आमच्या बाळाचं नाव ठरलंय : सानिया मिर्झा
सानिया आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळाचं आडनाव मिर्झा मलिक असेल, असंही तिने सांगितलं होतं.
सानिया आणि शोएब यांनी 2010 मध्ये निकाह केला होता. पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केल्यामुळे सानियावर टीकेची झोड उठली होती. लग्नाला आठ वर्ष झाल्यानंतरही सानियाला अधूनमधून ट्रोल केलं जातं.