चलती फिरती हुई ऑंखों से अजॉं देखी है मैंने जन्नत तो नहीं देखी है, मॉं देखी है।
मोदी सरकार सत्तेवर आलं तेव्हा 2014 मध्ये मुनव्वर राणा यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पुरस्कार परत केला होता.रेल्वे प्रवासातील 'दर्द', मुनव्वर राणांचं रेल्वे मंत्र्यांना ट्विट
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2018 04:00 PM (IST)
“आते हैं जैसे जैसे बिछड़ने के दिन क़रीब| लगता है जैसे रेल से कटने लगा हूँ मैं” लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी लिहिलेल्या या ओळी काल त्यांनाच लागू झाल्या.
नवी दिल्ली: “आते हैं जैसे जैसे बिछड़ने के दिन क़रीब| लगता है जैसे रेल से कटने लगा हूँ मैं” लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी लिहिलेल्या या ओळी काल त्यांनाच लागू झाल्या. मुनव्वर राणा यांना रात्रीचा रेल्वे प्रवास जागूनच करावा लागला. लोअर बर्थ न मिळाल्याने, 66 वर्षीय मुनव्वर राणा यांनी रेल्वे प्रवासात काय त्रास झाला, याबाबतच ट्विट केलं. मुनव्वर राणा हे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लखनऊवरुन दिल्लीला निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत 67 वर्षीय मित्र मुनव्वर जाफरी आणि आणखी एक जण असे एकूण तीन जण होते. गुडघे दुखीने त्रस्त असलेल्या मुनव्वर राणा कॅन्सरशीही झुंज देत आहेत. वाढलेल्या वजनामुळे त्यांना चालणं-फिरणंही अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत ते गुडघ्यावरी शस्त्रक्रियेसाठी लखनऊवरुन दिल्लीला येणार होते. त्यांनी एसी फर्स्ट क्लासचं तिकीटंही बुक केलं होतं. मात्र त्यांना खालची सीट अर्थात लोअर बर्थ मिळाला नाही. ना मुनव्वर राणा यांना, ना त्यांच्या मित्राला..कोणालाही लोअर बर्थ मिळाला नाही. त्यामुळे मुनव्वर राणा यांना रात्रभर जागूनच प्रवास करावा लागला. त्याबाबतचं ट्विट त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाला केलं. “तीन प्रवाशांपैकी दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. मात्र तरीही आम्हाला अप्पर बर्थ मिळाला. ज्येष्ठ नागरिकांना हीच सुविधा मिळते?” असं ट्विट मुनव्वर राणा यांनी केलं. राणांनी आपल्या ट्विटमध्ये रेल्वेमंत्री, रेल्वे मंत्रालय यांना मेन्शन केलं. या ट्विटमध्ये त्यांनी पीएनआर नंबर, ट्रेन नंबर आणि बर्थ नंबर याबाबतची माहिती दिली. मुनव्वर राणा हे आपल्या शायरींमुळे देशभरात ओळखले जातात. उतरतं वय आणि प्रकृती साथ देत नसतानाही, त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं आहे. त्यांचे शेर-शायरी ऐकण्यासाठी आजही लोक गर्दी करतात. त्यांनी आईबाबत लिहिलेली शायरी देशभरातील कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतेच मिळते.