National Cricket Academy: आशिया चषक 2022 ची उत्सुकता आता सर्व क्रिकेटप्रेमींना आहे. या मालिकेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत (IND vs PAK 2022) होणार आहे. हा हायहोल्टेज सामना 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल.  20 ऑगस्ट रोजी बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये या फिटनेस शिबिराचे आयोजन केले आहे. तर भारतीय संघ 23 ऑगस्टला  आशिया चषक खेळण्यासाठी दुबईला रवाना होणार आहे.
 
23 ऑगस्ट रोजी रवाना होणार टीम इंडिया

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वात भारतीय संघ 20 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) मधील फिटनेस टेस्टमध्ये सहभागी होणार आहे. तर 23 ऑगस्ट रोजी  टीम इंडिया दुबई (Dubai) साठी रवाना होईल. आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी खेळणार आहे. पहिलाच सामन्यात भारतीय संघ आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे.  दीपक हुडा आणि आवेश खान हे खेळाडू झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहेत, जे आशिया कप खेळणार आहेत. 

आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.
 
आशिया चषकासाठी भारतीय टीम- 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान

आशिया चषकाचं संपूर्ण वेळापत्रक-

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई