भारतीय खेळाडूंची पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, काळ्या फिती बांधून निषेध
बीसीसीआयने खेळाडूंना हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू, अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांना पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय खेळाडूंनी या हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून आणि मैदानावर मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय खेळाडूंनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
क्रिकेटच्या माध्यमातूनही पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी अनेकांकडून होत आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असंही मत व्यक्त केलं जात आहे.