मुंबई : भारताच्या पुढील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरूवात पुढील वर्षी 3 जुलैला होणाऱ्या टी-20 सामन्यांपासून होईल. त्यानंतर 12 ते 17 जुलै या कालावधीत वन डे सामने खेळवण्यात येतील.
1 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2018 या दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडेल.
भारताच्या 2018च्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक:
टी-20 मालिका
3 जुलै - पहिला टी- ट्वेंटी सामना - ओल्ड ट्रॅफोर्ड
6 जुलै - दुसरा टी- ट्वेंटी सामना - सोफिया गार्डन
8 जुलै - तिसरा टी- ट्वेंटी सामना - काऊंटी ग्राऊंड
वन डे मालिका
12 जुलै - पहिला वन डे सामना - टेंट ब्रिज
14 जुलै - दुसरा वन डे सामना - लॉर्डस
17 जुलै - तिसरा वन डे सामना - हेडिंग्ले
कसोटी मालिका
1 ते 5 ऑगस्ट - पहिला कसोटी सामना – एजबेस्टन
9 ते 13 ऑगस्ट - दुसरा कसोटी सामना - लॉर्डस
18 ते 22 ऑगस्ट - तिसरा कसोटी सामना - टेंट ब्रिज
30 ऑगस्ट ते 3 सप्टे. - चौथा कसोटी सामना – रोज बाउल
7 ते 11 सप्टे. - पाचवा कसोटी सामना - ओव्हल
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
05 Sep 2017 09:01 PM (IST)
या दौऱ्याची सुरूवात पुढील वर्षी 3 जुलैला होणाऱ्या टी-20 सामन्यांपासून होईल. त्यानंतर 12 ते 17 जुलै या कालावधीत वन डे सामने खेळवण्यात येतील.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -