नवी दिल्ली : बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. पण अद्यापही ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
काही मीडिया रिपोर्टनुसार, हनीप्रीत एका गाडीतून उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधील जंगलातील रस्तानं नेपाळमध्ये पळून गेल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तिचा तपास त्या दिशेनं सुरु आहे.
दरम्यान, शिक्षेच्या सुनावणीवेळी हनीप्रीत राम रहीमच्या सोबतच होती. पण त्यानंतर ती अचानक गायब झाली. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
हनीप्रीतवर नेमके आरोप काय?
राम रहीमला पळवून नेण्यासाठी कट रचल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पोलिसांच्या मते, 25 ऑगस्टला राम रहीम जेव्हा जेलमध्ये गेला तेव्हा हनीप्रीतनं काही गुंडांच्या मदतीनं हिंसाचार घडवून आणला. ज्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले. तसेच या हिंसाचाराचा फायदा घेऊन राम रहीमला पळवून नेण्याच कटही तिने रचला होता. असा पोलिसांचा दावा आहे.
बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2017 06:53 PM (IST)
काही मीडिया रिपोर्टनुसार, हनीप्रीत एका गाडीतून उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधील जंगलातील रस्तानं नेपाळमध्ये पळून गेल्याचं म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -