सेल्फीच्या नादात 23 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2017 06:20 PM (IST)
नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका 23 वर्षीय तरुणाचा सेल्फीच्या नादापायी नदीत बुडून मृत्यू झाला.
नाशिक : नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका 23 वर्षीय तरुणाचा सेल्फीच्या नादापायी नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. नाशिकमधील चेहेडी परिसरातील किशोन सोनार हा 23 वर्षीय तरुण आपल्या आई वडिलांसोबत विसर्जनासाठी दारणा नदीपात्रात गेला होता. यावेळी सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो नदीपात्रातच बुडाला. ही घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडल्याचं समजतं आहे. या घटनेमुळे सोनार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, प्रशासनाकडूव वारंवार सुरक्षेबाबत सूचना देण्यात येत असतानाही अनेक जण विसर्जनादरम्यान सेल्फीसाठी धडपडत असल्याचं दिसून आलं आहे.