मुंबई : इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. चिकनगुनियातून सावरलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने संघात पुनरागमन केलं आहे. तर गौतम गंभीरलाही संघात स्थान टिकवण्यात यश मिळालं आहे.


तसंच दुखापतीमुळे केएल राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी हार्दिक पंड्या, करुण नायक आणि जयंत यादव यांना संधी मिळाली आहे.

इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याला 9 नोव्हेंबरपासून राजकोटमधील कसोटी सामन्याने सुरुवात होईल. या दौऱ्यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत टीम इंडियाची निवड करण्यात आली.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, गौतम गंभीर, अमित मिश्रा, रविंद्र जाडेजा, करुण नायर, मुरली विजय, आर अश्विन, रिद्धीमान साहा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, जयंत यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा