मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटचाहत्याला भारतातून चालता होण्याचा सल्ला दिल्याने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग, अशी तंबी प्रशासकीय समितीने कोहलीला दिल्याचं समजतं. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुक्रवारी रवाना झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून दौऱ्यातील पहिला ट्वेण्टी 20 सामना खेळवण्यात येईल. त्या पार्श्वभूमीवर विराटला ही ताकीद देण्यात आली आहे.
परदेशी खेळाडू आवडत असल्यास भारतातून चालता हो, असा सल्ला विराट कोहलीने क्रिकेटचाहत्याला दिला होता. मात्र त्याचा हा सल्ला प्रशासकीय समितीला रुचला नाही. यासंदर्भात समितीने विराट कोहलीशी फोनवरुन बातचीत केली. "मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग. तसंच तुझं वर्तन हे भारतीय कर्णधाराला साजेसं असावं," असं समितीने त्याला सांगितलं.
यावर विराटने काय उत्तर दिलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु विराटने हा सल्ला फारच मनावर घेतल्याचं, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं.
काय आहे प्रकरण?
"भारतीय खेळाडू ओव्हररेटेड आहेत. एक फलंदाज म्हणून सध्या विराट कोहलीचं खूपच स्तोम माजवण्यात येत आहे. त्याच्या फलंदाजीत विशेष असं काही नाही. सध्याच्या भारतीय फलंदाजांपेक्षा मला इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज अधिक भावतात," असं एका चाहत्याने लिहिलं होतं.
त्यावर परदेशी खेळाडू आवडत असल्यास भारतातून चालता होण्याचा सल्ला विराट कोहलीने दिला. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका व्हायला लागली. ट्रोल झाल्यानंतर विराट कोहलीने ट्विटरवर उत्तर दिलं. "मला ट्रोलिंगची सवय आहे. कमेंट्समध्ये 'हे भारतीय' ज्या पद्धतीने लिहिलं होतं, त्याबद्दल मी भाष्य केलं, मी कायमच व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करत आलो आहे. फार गांभीर्याने घेऊ नका. सणाचा आनंद घ्या," अशा आशयाचं ट्वीट विराटने केलं होतं.
मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग, प्रशासकीय समितीची विराटला तंबी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Nov 2018 11:11 AM (IST)
यावर विराटने काय उत्तर दिलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु विराटने हा सल्ला फारच मनावर घेतल्याचं, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -