कर्नाटकच्या मयांक अगरवालचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे.
दुखापतग्रस्त ईशांत शर्मा आणि हार्दिक पंड्याचा मात्र या संघनिवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही. 4 ऑक्टोबरला राजकोटमध्ये मालिकेतल्या पहिल्या कसोटीला सुरुवात होईल.
टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार)
केएल राहुल
पृथ्वी शॉ
मयांक अगरवाल
चेतेश्वर पुजारा
अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)
हनुमा विहारी
ऋषभ पंत
आर अश्विन
रवींद्र जाडेजा
कुलदीप यादव
मोहम्मद शमी
उमेश यादव
मोहम्मद सिराज
शार्दूल ठाकूर