मुंबई : सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी आज 16 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी  विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. दुखापतीतून सावरलेला केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, अंबाती रायुडू यांचंही आशिया चषकातून पुनरागमन होणार आहे. तर राजस्थानच्या खलील अहमद या युवा खेळाडूचंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होत आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद आशिया चषकाचं वेळापत्रक आशिया चषकातील गतविजेता भारतीय संघ यावेळच्या मालिकेत 19 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचं मालिकेत खेळणं निश्चित आहे. मात्र उर्वरित स्थानांसाठी यूएई, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँगकाँग यांच्यात लढत होणार आहे. क्वालीफायर सामन्यांनंतर या संघांपैकी कोण जागा मिळवतं, ते निश्चित होईल. अ गटात भारत, पाकिस्तान, क्वालिफायर करणारा संघ आणि ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांना स्थान मिळालं आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला असेल. प्रत्येक गटातील टॉपला असलेले दोन संघ सुपर चारसाठी क्वालीफाय होतील. त्यानंतर या सामन्यांमधील विजेत्या संघांमध्ये चषक विजयासाठी लढत होईल. आशिया चषकाचं वेळापत्रक ग्रुप राऊंड 15 सप्टेंबर : बांगलादेश वि.श्रीलंका (दुबई) 16 सप्टेंबर : पाकिस्तान वि. क्वालीफायर (दुबई) 17 सप्टेंबर : श्रीलंका वि. अफगाणिस्तान(अबु धाबी) 18 सप्टेंबर : भारत वि. क्वालीफायर (दुबई) 19 सप्टेंबर : भारत वि. पाकिस्तान (दुबई) 20 सप्टेंबर : बांगलादेश वि. अफगाणिस्तान (अबु धाबी) 21 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट अ उप विजेता (अबु धाबी) 23 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट अ उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी) 25 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब विजेता (दुबई) 26 सप्टेंबर : गट अ उप विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी) 28 सप्टेंबर : फायनल (दुबई)