पुणे : दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन झालेल्या वादातून पाच जणांनी एकावर तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागातील माणिकबाग परिसरातील मध्यरात्रीची ही घटना आहे.
अक्षय गडशी (वय 23) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून त्याची हत्या केली.
शहरात दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा आणि आयोजित कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यातून दोन गटात किरकोळ वादही होत आहेत. मात्र, शनिवारी मध्यरात्री याच वादातून थेट तरुणाला संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद, पुण्यात तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Sep 2018 10:40 AM (IST)
पुण्यातील सिंहगड रोड भागातील माणिकबाग परिसरातील मध्यरात्रीची ही घटना आहे. अक्षय गडशी (वय 23) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -