केपटाऊन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा सुपूर्द करण्यात आली. आयसीसीच्या कसोटी विजेतेपदाचं प्रतीक असलेली ही गदा कोहलीला देण्यात आली.

भारताचे माजी कसोटीवीर सुनील गावस्कर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीवीर ग्रॅमी पोलॉक यांच्या हस्ते ही गदा टीम इंडियाला प्रदान करण्यात आली. टीम इंडियाला आयसीसीच्या वतीनं मानाची गदा आणि दहा लाख अमेरिकन डॉलर्स असं इनाम देण्यात आलं.

टीम इंडियानं सहा सामन्यांची मालिका 4-1 ने खिशात घातली होती. भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जिंकलेली ही वन डे सामन्यांची पहिलीवहिली मालिका ठरली.

आयसीसीच्या कसोटी आणि वन डे क्रमवारीत टीम इंडिया एकाचवेळी नंबर वन आहे. कर्णधार विराट कोहलीसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब ठरावी.

पराभवांची मालिका

1992-93 साली भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली सात वन डे सामन्यांची मालिका 2-5 अशी गमावली. मग 2006-07 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर 0-4 असं लोटांगण घातलं.

2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेकडून 2-3 अशी निसटती हार स्वीकारली. 2013-14 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

संबंधित बातम्या :


आयसीसीच्या वन डे क्रमवारीत विराट सेना अव्वल


शतकानंतर रोहित शर्माचं पत्नीला खास व्हॅलेंटाईन गिफ्ट


... म्हणून शतकानंतरही सेलिब्रेशन न करता शांत होतो : रोहित शर्मा


मालिका विजयानंतर विराटचं द. आफ्रिकेला 'अखेरचं आव्हान'


भारताकडून मायदेशात पराभव, द. आफ्रिकेला विश्वचषकाची चिंता


धवनची विकेट सेलिब्रेट करणं रबाडाला महागात, आयसीसीची कारवाई


VIDEO : सामन्याला कलाटणी देणारा पंड्याचा भन्नाट 'थ्रो'


धोनीने घेतलेला DRS निर्णय चुकला, सोशल मीडियावर ट्रोल


भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला


भारताने इतिहास रचला, द. आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका विजय