या विजयासोबतच टीम इंडिया आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर विराजमान झाली आहे. 2014 नंतर टीम इंडियाने आपली जागा पुन्हा मिळवली. अगोदरपासूनच कसोटीत अव्वल असणाऱ्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं.
इंदूर वन डेपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या नावावर प्रत्येकी 119 गुण होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या खात्यात आणखी एका गुणाची भर पडून 120 गुण झाले. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केलं.
आयसीसी वन डे रँकिंगमध्ये आता भारत 120 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका (119), ऑस्ट्रेलिया (114), इंग्लंड (113) आणि न्यूझीलंड 111 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.