शेन वॉर्नकडून मारहाण, पॉर्न स्टारची तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2017 08:11 PM (IST)
शेन वॉर्नकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप पॉर्न स्टारने केला आहे.
लंडन : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने मारहाण केल्याचा आरोप वॅलेरी फॉक्स या पॉर्न स्टारने केला आहे. याप्रकरणी फॉक्सने शेन वॉर्नविरोधात तक्रारही दाखल केली आहे. https://twitter.com/ValerieFoxxx/status/911442182569103360 फॉक्सने जखमा झालेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत शेन वॉर्नवर मारहाण केल्याचा आरोप केला. ‘’तुम्ही लोकप्रिय असाल, मात्रकोणत्याही महिलेला मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही’’, असं फॉक्सने ट्विटरवर म्हटलं आहे. https://twitter.com/ValerieFoxxx/status/911434404471468032 फॉक्सने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शेन वॉर्नचं नाव लिहिलेलं नाही. मात्र महिलेला मारहाण करुन स्वतःचा अभिमान वाटत आहे का? असा सवाल तिने केला आहे. शेन वॉर्नवर लावलेले आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते. https://twitter.com/ValerieFoxxx/status/911432265959460869