मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित ट्वेन्टी-20 मुंबई लीगच्या आयकॉन खेळाडूंसाठी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादवला सगळ्यात महागडे खेळाडू ठरले. रहाणे आणि सूर्यकुमारला अनुक्रमे मुंबई नॉर्थ आणि मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक सात लाखांची बोली लावण्यात आली.
याशिवाय रोहित शर्माला सहा लाखांची बोली लावत मुंबई नॉर्थ वेस्ट संघाने विकत घेतलं. तर श्रेयस अय्यरला मुंबई नॉर्थ सेंट्रल संघाने पाच लाखांची बोली लावली.
अभिषेक नायर आणि सिद्धेश लाडचा त्यांच्या मूळ किंमतीत म्हणजेच चार लाखात मुंबई साऊथ आणि मुंबई साऊथ वेस्ट संघाचे आयकॉन खेळाडू या नात्याने समावेश करण्यात आला आहे. मुंबई रणजी संघाचा कर्णधार आदित्य तरे मात्र या आयकॉन खेळाडूंच्या लिलावात अनसोल्ड ठरला.
11 ते 21 मार्चदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियम ही टी-20 मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील सहा संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईतील स्थानिक खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे.
टी20 मुंबई लीग लिलाव : रहाणे, यादवला सर्वाधिक बोली
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
03 Mar 2018 04:17 PM (IST)
11 ते 21 मार्चदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियम ही टी-20 मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील सहा संघ सहभागी होणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -