शिलाँग : मेघालय विधानसभेत सध्या त्रिशंकू अवस्था पाहायला मिळत आहे. मेघायल विधानसभेच्या 60 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरु असून काँग्रेस 21 जागांवर पुढे आहे. तर एनपीपी 18 जागांवर पुढे आहे. तर 14 इतर उमेदवार देखील सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे आता सत्तेसाठी काँग्रेस कोणाला सोबत घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2009 पासून मेघालयमध्ये काँग्रेसचं सरकार असून मुकुल संगमा हे मुख्यमंत्री आहे. 2013 साली काँग्रेसला 60 पैकी 29 जागांवर विजय मिळाला होता पण आता काँग्रेस सध्या काहीशी मागे पडली आहे. पण सध्याचे कल पाहता काँग्रेस मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघालयात काँग्रेस सत्ता स्थापन करु शकतं.
दरम्यान, मेघालयात काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने बराच प्रयत्नही केला होता. मात्र, इथं भाजपला म्हणावं तसं यश आलं नाही.