पुढील पाच वर्ष 'या' एकाच शहरात खेळवणार टी-10 क्रिकेट लीग, 'मराठा अरेबियन्स'च्या कामगिरीकडे लक्ष
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2019 07:37 PM (IST)
टी-10 क्रिकेट लीगचे यंदा पुन्हा एकदा आयोजन करण्यात आले आहे. यनायटेड अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथे या वर्षी सुरु होणाऱ्या टी-10 क्रिकेट लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
6thth March 2019.
अबू धाबी : यनायटेड अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथे या वर्षी सुरु होणाऱ्या टी-10 क्रिकेट लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील पाच वर्ष याच ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. अबू धाबीमधील जायेद क्रिकेट स्टेडियमवर टी-10 लीग स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. अबू धाबी क्रिकेटने (एडीसी) अबू धाबी स्पोर्ट्स काऊन्सिल आणि टी-10 क्रिकेट टूर्नामेंटच्या आयोजकांसोबत पाच वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार या टूर्नामेंटचे पुढील पाच वर्षे सर्व सामने अबू धाबीच्या जायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. यावर्षीच्या टी-10 क्रिकेट लीगमध्ये पाकिस्तानचा शाहिद अफ्रीदी, ऑस्ट्रेलियाचा शेन वॅटसन, दक्षिण आफ्रिकेचा कॉलिन इन्ग्राम, न्यूझीलंडचा ल्यूक रोन्ची, वेस्ट इंडीजचा आंद्रे फ्लेचर हे खेळाडू खेळणार आहेत. 2017 मध्ये टी-10 क्रिकेट लीगचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. एक सामना केवळ 90 मिनिटांमध्ये संपवला जातो. या सामन्यात चोकार आणि षटकारांची जबरदस्त आतषबाजी पाहायला मिळते. गेल्या वेळी टी-10 लीगमध्ये ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, आंद्रे रसेल, सरफराज अहमद, शेन वॅटसन, इयान मॉर्गनसारख्या अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता. मागील सीझनमध्ये एकूण आठ संघ होते. ज्यामध्ये मराठा अरेबियन्स, बेंगाल टायगर्स, केरला नाईट्स, नॉर्थन वॉरियर्स, पख्तून्स, पंजाबी लेजन्ड्स, राजपूत्स आणि सिंधीज या संघांचा समावेश होता. नॉर्थन वॉरियर्सने पख्तून्स या संघाला नमवत पहिल्या टी-10 लीगची ट्रॉफी उंचावली होती.