पुणे : स्वतःची आणि पत्नीची हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी चोरी करण्याची वेळ एका इसमावर आली आहे अनिल गायकवाड (54)असे त्याचे नाव असून तो दौंड येथील रहिवासी आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दौंड येथे राहणारा अनिल आणि त्याच्या पत्नीला हृदयरोग आहे. दोघांवरही सध्या उपचार सुरु आहेत. त्यांचा मुलगा पुण्यात मजुरीचे काम करतो. त्याच्या कमाईमध्ये घराचा खर्च कसाबसा चालतो. मात्र उपचारासाठी पैसे नाहीत.
7 मार्च रोजी नियमित तपासणीसाठी अनिल डॉक्टरांकडे गेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करुन घेण्यास सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनिलकडे इतके पैसे नसल्यामुळे त्याने रुग्णालयाच्या बाहेर येताच एक दुचाकी चोरली.
चोरलेली दुचाकी घेऊन तो पिंपरी-चिंचवड येथील पाहुण्यांकडे गेला. तिथे त्याने एका ज्वेलर्सची रेकी केली. त्याने एक व्यक्ती ज्वेलर्समधून दागिने घेऊन बाहेर आल्याचे पाहिले. त्या व्यक्तीने मोबाईल आणि दागिने स्कूटरच्या डिकीत ठेवले. काही अंतर पुढे गेल्यावर ती व्यक्ती एका मिठाईच्या दुकानासमोर थांबली. दुकानाबाहेर स्कूटर पार्क करुन ती व्यक्ती मिठाईच्या दुकानात गेली. त्याचदरम्यान एका टोकदार वस्तूच्या सहाय्याने अनिलने त्या व्यक्तीच्या स्कूटरची डिकी उघडून त्यामधील दागिने आणि मोबाईल असा एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अनिलची ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सीसीटीव्हीच्या आधारने पिंपरी पोलिसांनी अनिलला बेड्या ठोकल्या आहेत. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी चोरी केल्याचे अनिलने कबूल केले आहे. अनिलने 2010 मध्येदेखील चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तेव्हा अनिलने घरची परिस्थिती हालाकीची आहे म्हणून चोरी केल्याचे सांगितले होते.
पती-पत्नीला हृदयरोग, शस्त्रक्रियेसाठी चोरी करण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Mar 2019 05:16 PM (IST)
स्वतःची आणि पत्नीची हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी चोरी करण्याची वेळ एका इसमावर आली आहे अनिल गायकवाड (54)असे त्याचे नाव असून तो दौंड येथील रहिवासी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -