कोलकाता : गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छ भारत मोहिम सुरु होती. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मासोबत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.


रोहित, विराट, रहाणे आणि ठाकूर या सर्वांनी ईडन गार्डन्स स्टेडियमच्या स्टँड्समध्ये साफसफाई केली. ही साफसफाई सुरु असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयनं ट्विटरवर पोस्ट केला आहे.

दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यानंतर देशभरातून या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता.

https://twitter.com/BCCI/status/782564173687291904