पैलवान सुशिल कुमार WWE मध्ये दिसणार?
या संदर्भातील माहिती देताना सुशील कुमार म्हणाला की, ''माझी नुकतीच WWE च्या टॅलेंट डेव्हलपमेंट प्रमुखांशी भेट झाली. मला कुस्तीचा सराव सुरुच ठेवायचा असल्याने या भेटीनंतर माझ्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.'' याचाच अर्थ हौशी कुस्तीला 'गुडबाय' करणं होतो का? असं विचारलं असता त्याने याला स्पष्ट नकार दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतो म्हणाला की, ''मी हौशी (अमॅच्यूअर) कुस्ती सोडली असा याचा अर्थ होत नाही. कारण मला कुस्तीचा सराव कायम ठेवण्यासाठी इतर पर्यायही हताळायचे आहेत.'' रमण रहेजांची कंपनी सुपर स्पोर्टस सुशीलचा व्यवसाय पाहते. सुशील कुमारच्या WWE मधील सहभागासंबंधी ते म्हणाले की, ''WWE ने गेल्या काही काळापासून भारतातील आपला विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. यासंदर्भातच सुशील कुमारची गेल्या चार महिन्यांपासून सुशील कुमारसोबत चर्चा सुरु आहे.''
WWEचे टॅलेंट डेव्हलपमेंट प्रमुख केनयोन सीमॅन हे सुशील कुमारची भेट घेण्यासाठी ओरलांडोहून फ्लोरिडामध्ये आले होते.
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE)च्या अधिकाऱ्यांनी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारची नुकतीच भेट घेतल्याने त्याच्या WWEमध्ये सहभागा वरुन विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी बोलताना खली म्हणाला की, ''जर माझ्यानंतर आणखी एखादा भारतीय WWE मध्ये सहभागी झाल्यास मला आनंदच होईल. मात्र, त्याचं वय यामध्ये अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. पण भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या या कुस्तीपटूला मला रिंगमध्ये पाहताना नक्कीच आनंद होईल!''
अमेरिकन कुस्तीमध्ये या भारतीय कुस्तीपटूला आपली स्वत:ची ओळख बनवणे अवघड असल्याचे खली म्हणाला.
दरम्यान, सुशील कुमारच्या या स्पष्टीकरणानंतर WWEतील सहभागी स्पर्धक द ग्रेट खलीने सुशील कुमारला आव्हान दिले आहे.
ते म्हणाले की, ''यावर एका महिन्याच्या आतच निर्णय घेतला जाईल. केनयोन यांनी सुशील कुमारशी समोरासमोर चर्चा केली. ते सुशील कुमारला भेटण्यासाठी ओरलांडोतून इथे आले होते.''
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -