दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं वन डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळवण्यात येऊ शकते.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीचे सामने किंवा अंतिम सामना टाय झाल्यास, निकालासाठी सुपर ओव्हरच्या पर्यायाला आयसीसीनं मंजुरी दिली आहे.
याआधी केवळ अंतिम सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरचा पर्याय ठेवण्यात आला होता.
ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धांमध्ये अनेकदा साखळी फेरीच्या लढतींमध्येही सुपर ओव्हरचा वापर झाला आहे. मात्र वन डेत याआधी एकदाही सुपर ओव्हरचा वापर झालेला नाही.