हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर अवघ्या पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून, आयपीएलच्या प्ले ऑफमधलं आपलं स्थान पक्कं केलं.
बंगलोरला अखेरच्या षटकांत विजयासाठी १२ धावा हव्या असताना, हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारनं टिच्चून मारा केला. त्यानं बंगलोरला केवळ सहा धावा देऊन, हैदराबादला रोमांचक विजय मिळवून दिला.
हैदराबादचा हा दहा सामन्यांमधला आठवा विजय ठरला. या विजयासह हैदराबादच्या खात्यात आता सर्वाधिक सोळा गुण जमा झाले आहेत. हैदराबादच्या बंगलोरच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली.
सुरुवातीला फलंदाजीला या सामन्यात केन विल्यमसननं ५६ आणि शकिब अल हसननं ३५ धावांची खेळी करूनही हैदराबादचा डाव १४६ धावांत आटोपला होता. पण हैदराबादी गोलंदाजांनी बंगलोरला सहा बाद १४१ धावांत रोखून, आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.