हैदराबाद: कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या 59 चेंडूंमधल्या 126 धावांच्या खेळीनं हैदराबादला आयपीएलच्या सामन्यात बलाढ्य कोलकात्यावर 48 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
घरच्या मैदानातल्या या सामन्यात हैदराबादनं कोलकात्याला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 20 षटकांत सात बाद 161 धावांचीच मजल मारता आली.
हैदराबादच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो 43 चेंडूंत शतक ठोकणारा डेव्हिड वॉर्नर. आयपीएलमधलं ते आजवरचं पाचवं सर्वात जलद शतक ठरलं. वॉर्नरनं आपल्या या धडाकेबाज खेळीत 10 चौकार आणि 8 षटकार ठोकले.