कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा समाजाची आमसभा पार पडली. शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाबरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

मार्केट यार्ड परिसरातल्या श्री शाहू सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या सभेला महसूलमंत्री चंदकांत पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाडगे यांच्यासह अनेक खासदार आणि आमदार तसंच हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

या आमसभेत प्रामुख्याने मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं.