India vs New Zealand : जर तरच्या खेळामध्ये पाकिस्तानचा डाव खल्लास झाल्याने वर्ल्डकप सेमी फायनलचे चित्र स्पष्ट झालं आहे. यामुळे टीम इंडियाची लढत न्यूझीलंडशी होणार आहे, तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. टीम इंडियाचा महामकाबला बुधवारी भाऊबीज रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
टीम इंडियाची वर्ल्डकपमधील कामगिरी पाहता नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा क्रिकेटच्या चाहत्यांमधून होत आहे. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्यामुळे कधीही काहीही होऊ शकतं, याची जाणीव सुद्धा टीम इंडियाचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माला आहे. त्यामुळे सेमी फायनलमध्ये सुद्धा जबाबदारीने खेळ करून फायनल तिकीट कन्फर्म करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.
मात्र दुसरीकडे न्यूझीलंड टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. जेव्हा जेव्हा वर्ल्डकपची चर्चा होते तेव्हा नेहमीच तगड्या संघाची चर्चा होते. मात्र, न्यूझीलंडचे नाव क्वचितच चर्चेमध्ये दिसून येते. मात्र वर्ल्डकपच्या इतिहासातील या संघाचे सातत्य पाहिल्यास निश्चितच धडकी भरवणारी कामगिरी केली आहे. भारतासाठी, तर नेहमीच डोकेदुखीचा राहिला आहे. त्यामुळे सेमीफायनाची लढत ही नक्कीच एकतर्फी नसेल यामध्ये शंका नाही.
कधीही कोणाच्या चर्चेत नसणाऱ्या न्यूझीलंडने आजवर आपल्या कामगिरीने सर्वांनाच विस्मयचकित करून टाकलं आहे 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. 2011मध्येही त्यानी सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये फायनल गाठली होती. 2019 मध्ये अत्यंत दुर्दैवीरित्या फायनलमध्ये पराभव स्वीकाराला लागला होता.
दोन्ही संघ 2011 पासून वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये
टीम इंडियाने पहिल्यांदा 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर 1987, 1996, 2003, 2011, 2015 आणि 2019 सेमीफायनल गाठली आहे. यामध्ये धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये वर्ल्डकपवर नाव कोरले होते. न्यूझीलंड सुद्धा 2011 मध्ये सेमीफायनला आणि 2015 तसेच 2019 मध्ये फायनलला धडक दिली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता 2023 मध्येही ते सेमीफायनलला पोहोचले आहेत.
न्यूझीलंडने सलग तीन पराभव स्वीकारल्यानंतरही जोरदार कमबॅक करत सेमीफायनलचे तिकीट नक्की केलं आहे. त्यामुळे केन विल्यम्ससनच्या नेतृत्वातील टीम सुद्धा आता हा आजवरचा जो फुटक्या नशिबाचा खेळ सुरू आहे तो बदलण्याचा प्रयत्न करेल यामध्ये शंका नाही. दुसरीकडे 2019 मध्ये सर्वाधिक वेदना टीम इंडियाला न्यूझीलंडकून झाल्या होत्या. धोनी रन आऊट झाल्यानंतर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या