स्टीव्हन स्मिथचा पुणेरी पेहराव !
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2017 11:30 PM (IST)
मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी भारतीय क्रिकेटमधलं वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. पण त्या वातावरणाला थोडंसं हलकंफुलकं करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ चक्क पुणेकरांच्या पारंपरिक वेषात अवतरणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या नेतृत्वाची धुरा स्मिथच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं रायझिंग पुणेच्या प्रमोशनसाठी स्मिथनं बाराबंदी, धोतर, कमरेला शेला, गळ्याभोवती उपरणं आणि डोक्यावर पुणेरी पगडी असा पारंपरिक वेष परिधान केला होता. अजिंक्य रहाणेसोबतचा हा फोटो स्वत: स्मिथनंच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण प्रमोशनच्या व्हिडिओत स्मिथ कसा वावरला आहे, हे पाहण्यासाठी तुमच्याइतकेच आम्हीही उत्सुक आहोत.