लॉर्डसच्या दुसऱ्या कसोटीत स्मिथनं अनेक वेळा चेंडू अनोख्या पद्धतीनं वेल लेफ्ट केला. चेंडू सोडताना स्मिथच्या या अनोख्या शैलीचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय.
स्टीव्ह स्मिथनं क्रिकेटच्या परंपरागत शैलीला छेद देत फलंदाजीची एक वेगळी शैली निर्माण कैली आहे. तो फलंदाजी करताना एवढा शफल होतो की गोलंदाजी करताना गोलंदाजाला चेंडू कुठे टाकू आणि कुठे नको असं होतं.
स्मिथच्या या अनोख्या शैलीची दखल सोशल मीडियावरच्या अनेक नेटकऱ्यांनी घेत त्याला दाद दिली आहे. काहींनी तर विंडीजच्या कोर्टनी वॉल्शच्या स्टाईलशी स्मिथची तुलना केली आहे.
https://twitter.com/machanae1/status/1162346958125617152
दरम्यान स्मिथनं यंदाच्या अॅशेस मालिकेत आतापर्यंत तीन डावात दोन खणखणीत शतकं आणि एका शतकासह 234 धावांचा रतीब घातला आहे. त्याच्या झुंजार खेळीमुळे अॅशेस मालिकेतल्या पहिल्या एजबॅस्टन कसोटीत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला होता.
स्टीव्ह स्मिथची अॅशेस मालिकेतल्या मागील अकरा डावांतली कामगिरी :
143
नाबाद 141
40
6
236
76
नाबाद 102
83
144
142
92
डाव - 11
धावा - 1205
सरासरी - 133.88
100 - 6
50 - 3