कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर चेंडू अवैधरित्या हाताळल्याप्रकरणी कारवाई केली आहे. आयसीसीनं स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले आहेत.


दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टचं  चेंडू अवैधरित्या हाताळण कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलच अंगाशी आलं आहे. स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे. तर डेव्हिड वॉर्नरनही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर स्मिथनं याची कबुलीही देताना हा रणनितीचाच एक भाग होता, असं मान्य केलं होतं. या प्रकरणामुळे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून स्मिथची हकालपट्टील केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या आयपीएल सहभागाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

संबंधित बातम्या :

मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश

चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद

स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार