मुंबई : आमची अपेक्षा होती एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडेंना अटक होईल, पण सरकारकडून हालचाल नाही, असे भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, सरकारने लोकशाहीचा गळा दाबला असून, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारल्याची टीकाही त्यांनी केली.
मोर्चासाठी महाराष्ट्रभरातून जनता निघाली आहे. त्यांना आता रोखणं कठीण आहे. त्यामुळे उद्या आम्ही सीएसएमटीला जमणार आणि तिथं काय तो निर्णय होईल, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी घालतात. ज्यांनी मारलं त्यांना मोकाट सोडलं. सैतानाला पाठीशी घालायचं आणि सावाला मारायचं, अशी सरकारची भूमिका असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर केली.
“माझ्याबाबतीत कुणाला राजकीय भीती असण्याचं कारण नाही. कारण मला कुठलंही मंत्रीपद कधीच नको होतं. या सरकारनं आणि आधीच्या सरकारनंही मला मंत्रीपद ऑफर केलं होतं.”, असेही आंबेडकर म्हणाले.
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी उद्या मुंबईत निघणाऱ्या एल्गार रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राणी बाग ते आझाद मैदान अशी ही रॅली आयोजित आहे. मात्र परीक्षा सुरू असल्यानं रॅली काढू नका, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
सरकारने लोकशाहीचा गळा दाबला : प्रकाश आंबेडकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 05:24 PM (IST)
“माझ्याबाबतीत कुणाला राजकीय भीती असण्याचं कारण नाही. कारण मला कुठलंही मंत्रीपद कधीच नको होतं. या सरकारनं आणि आधीच्या सरकारनंही मला मंत्रीपद ऑफर केलं होतं.”, असेही आंबेडकर म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -