कोलंबो : 'भारतीय संघ अतिशय कठोर प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे श्रीलंकेनं भारतीय संघाप्रमाणे खेळ करणं आवश्यक आहे.' असं स्पष्ट मत श्रीलंकेचा अंतरिम प्रशिक्षक निक पोथासनं व्यक्त केलं आहे.
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघानं कसोटी, वनडे आणि टी20च्या सर्व सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवत एक मोठा इतिहास रचला. त्यामुळे सध्या श्रीलंकन संघावर बरीच टीका सुरु आहे.
याबाबत बोलताना प्रशिक्षक पोथासनं भारतीय संघाचं कौतुक केलं. 'आमचा संघ अजूनही विकास प्रक्रियेत आहे. भारतीय संघात जबरदस्त क्षमता आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणं खरंच कठीण होतं.' असं पोथास म्हणाले.
'आम्हाला आणखी नव्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. आम्हाला भारतीय संघाकडून खेळाचे डावपेच शिकायला हवेत. विराट फलंदाजी करताना कशा पद्धतीनं धावा जमवतो हे तुम्ही पाहिलंच आहे. मैदानावरही कर्णधार म्हणून त्याला भरपूर मान मिळतो. तो लोकांसाठी रोल मॉडेल आहे.' असंही पोथास यावेळी म्हणाले.
'आम्हाला चुका सुधारण्याची गरज आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाकडून शिकण्याची गरज आहे.' अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली.
संबंधित बातम्या :
सलग 9 सामन्यात विजय... टीम इंडियाचा भीमपराक्रम!
INDvsSL टी20 : भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय
'श्रीलंकेला भारताकडून डावपेच शिकण्याची गरज'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2017 06:14 PM (IST)
'आम्हाला भारतीय संघाकडून खेळाचे डावपेच शिकायला हवेत. विराट फलंदाजी करताना कशा पद्धतीनं धावा जमवतो हे तुम्ही पाहिलंच आहे. मैदानावरही कर्णधार म्हणून त्याला भरपूर मान मिळतो. तो लोकांसाठी रोल मॉडेल आहे.'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -