मुंबई : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची कन्या श्रुती बडोलेने स्वत:हून परदेश शिष्यवृत्ती सोडण्याची तयारी दर्शवली आहे. शिष्यवृत्ती निवडीवरुन झालेल्या वादानंतर श्रुतीनं हा निर्णय घेतला आहे. यावेळी श्रुतीनं आपल्याला गुणवत्तेनुसार प्रवेश आणि शिष्य़वृत्ती मिळाली असल्याचा दावा केला आहे. तसंच, माझ्यात गुणवत्ता आहे पण माझे बाबा मंत्री आहेत, त्यात माझा काय दोष? असा सवालही श्रुतीनं विचारला आहे. मात्र, कुणाचाही हक्क आपण डावलला नसून, जर यामुळे कुण्या दुसऱ्याची गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर आपण शिष्यवृत्ती नाकारत असल्याचंही श्रुतीनं पत्रातून स्पष्ट केलं आहे. श्रुतीने पत्रात काय म्हटलंय?   काय आहे प्रकरण? राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांची नावंही ही या यादीत आढळतात. अनुसूचित जातीच्या गरजू विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना मंत्र्यांनी मुलांसाठी वापरल्याचा आरोप होत आहे. संबंधित बातम्या :
परदेशी शिष्यवृत्तीसाठी मुलीची निवड निकषानुसार : बडोले
सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलीलाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ