शिक्षा सुनावणीदरम्यान अबू सालेम कोर्टात काय करत होता?
मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा कोर्टाचा निकाल
ताहीर मर्चंट आणि फिरोज खान या दोघांना टाडा कोर्टाचे न्यायाधीश जी.ए.सानप यांनी फाशीची शिक्षा सुनावली. तर अबू सालेम आणि करिमुल्लाह खान या दोघांना जन्मठेप देण्यात आली. आणि रियाज सिद्दीकी या पाचव्या दोषीला 10 वर्षाची कैद सुनावण्यात आली आहे.
तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईतल्या 93 बॉम्बस्फोटांचा हा निर्णय आला. 12 मार्च 1993 ला मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. ज्यात 257 लोकांचा मृत्यू तर 700 हून अधिक जणांना गंभीर इजा झाल्या होत्या. या बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमनसह 27 आरोपी अजूनही फरार आहेत.