SRH vs RCB IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये कालपासून प्लेऑफच्या लढतींना सुरुवात झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात दुसरा प्लेऑफ सामना खेळवण्यात येणार आहे. ज्याला एलिमिनेटर असं म्हटलं जातं. आज जो संघ पराभूत होईल त्याचा आयपीएल 2020 मधील प्रवास तिथेच थांबणार आहे. या सामान्यात जिंकणाऱ्या संघाला फायनलमध्ये दिल्ली कॅपीटलशी सामना करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचली आहे.
सनरायझर्सने विजयाची हॅटट्रिक
सनरायझर्सने विजयाची हॅटट्रिक साजरी केली. सनरायझर्सने अखेरच्या तीन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि अव्वल स्थानावरील मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. हैदराबादची कामगिरी चांगली आहे. आजच्या सामन्यात बंगळूरु विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याच्या निर्धारानेच उतरेल. कॅप्टन डेव्हिड वॉर्नरने या हंगामात 529 धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या विरोधात गेल्या सामन्यात शेवटच्या षटकांत होल्डर आणि संदीप शर्मा यांनी शानदार प्रदर्शन केले होते. त्यांच्यासोबत आता टी. नटराजन आणि राशिद खानच्या समावेशाने हैदराबादच्या गोलंदाजाची बाजू भक्कम झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सलग चार सामन्यात पराभव
बंगलोरने यंदाच्या हंगामात चांगली सुरुवात केली होती. मात्र नंतर बंगळने फॉर्म गमावला. अखेरच्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बंगलोरचा संघ केवळ 120 धावा करू शकला होता. या सामन्यात बंगलोरचा कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. तसेच गोलंदाजांची कामगिरीही निराशाजनक राहिली. बंगलोरला आजचा सामना जिंकायचा असेल तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल.