Shoaib Akhtar on Pakistan Team :  टी-20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध (Pakistan-England) पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर अनेक दिग्गजांची वक्तव्ये समोर येत आहेत, दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) असे वक्तव्य केले आहे की, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काय म्हणाला शोएब अख्तर?


''आता भारतातच विश्वचषक जिंकणार'' -  शोएब अख्तर


पाकिस्तानसाठी यावेळी ही स्पर्धा चढ-उतारांनी भरलेली होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्येही संघाला टीकेला सामोरे जावे लागले, मात्र संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला. या पराभवानंतर शोएब अख्तरही निराश दिसला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून या पराभवावर आपले म्हणणे मांडले. 'हा विश्वचषक पाकिस्तान हरला असला तरी भारतातच विश्वचषक जिंकेल, असा विश्वास अख्तरला आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत त्याने हे सांगितले आहे.


आपल्या खेळाडूंचा केला बचाव 


शोएब अख्तरने त्याच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडूंबाबत म्हटले आहे की, 'तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या जवळ होता, पण तरीही अंतिम सामना खेळला. संपूर्ण विश्वचषकात पाकिस्तानच्या गोलंदाजीने चांगली कामगिरी केली. पाकिस्तानने चांगला खेळ केला, तो विश्वचषक जिंकण्यास पात्र होता. शाहीनची दुखापत हा टर्निंग पॉइंट होता, पण तो ठीक आहे. आता इथून स्वतःला खाली पडू द्यायचं नाही.


मी निराश आणि दुखावलो आहे - अख्तर
शोएब अख्तरने या व्हिडीओमध्ये पुढे म्हटले आहे की, 'जसे बेन स्टोक्सने T20 वर्ल्ड कप 2016 मध्ये षटकार ठोकले आणि त्याच्यामुळेच इंग्लंड मॅच हरली. मात्र आज टीम वर्ल्ड कप जिंकून त्यांची सुटका झाली. पाकिस्तान टीम, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. काळजी करण्याची गरज नाही. मी निराश आणि दुखावलो आहे, पण ठीक आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता आपण भारतात विश्वचषक जिंकू... 


 


T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य दिले होते, जे इंग्लंडने 5 विकेट्स गमावून सहज गाठले. इंग्लंडचा धडाकेबाज अष्टपैलू बेन स्टोक्सने पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात संघासाठी मॅचविनर असल्याचे सिद्ध केले. बेन स्टोक्सने 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या, या खेळीत त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.