नवी दिल्ली : अर्थसंकल्पात क्रीडा मंत्रालयासाठी तब्बल 350 कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार क्रीडा मंत्रालयाला मिळणाऱ्या निधीमध्ये ही घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात क्रीडा मंत्रालयाला 1592 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. तर आगामी आर्थिक वर्षात क्रीडा मंत्रालयाला 1943 कोटी रुपये मिळणार आहेत. 2018 सालच्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाला 481 कोटी रुपये मिळणार आहेत. तर राष्ट्रीय क्रीडा संघटनांना तब्बल 302 कोटी रुपये मिळतील. खेलो इंडिया मोहिमेसाठी तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र खेळातील गुणवत्ता शोधण्यासाठीच्या योजनांसाठी केवळ 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित बातम्या :