तुटलेली विजेची तार मानेतूर आरपार, रत्नागिरीत दुचाकीस्वाराचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2017 05:37 PM (IST)
रत्नागिरी : मुंबई -गोवा महामार्गावरील सावर्डेजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. वीज वितरण कंपनीची तार मानेतून आरपार गेल्याने तरुणाचं डोकं धडावेगळं झालं. मुंबई-गोवा महामार्गावरील वीज वितरण कंपनीची वीजवाहक तार तुटली आणि दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाच्या मानेत अडकली. त्याच्या दुचाकीचा वेग इतका जास्त होता, की ती तार त्याच्या मानेतून आरपार गेली आणि तरुणाचं डोकं धडापासून वेगळं होऊन रस्त्यावर पडलं. मयुर देवरुखकर असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तुटलेल्या तारेविषयी दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी वीज वितरणला कळवलं होतं. मात्र त्यावर काहीच कारवाई न झाल्यानं वीज वितरण कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.