सेंच्युरियन (द. आफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्धची पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 नं आघाडीन घेतली आहे. पण याच सामन्यात द. आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन जायबंदी झाला असल्यानं त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याऐवजी वेगवान गोलंदाज डुआने ओलिवर आणि नगीदी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या कसोटीत फिलेंडरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 72 धावांनी मात केली होती. पण याच सामन्यात डेल स्टेनच्या टाचेला गंभीर दुखापत झाली. यामुळे तो पुढील दोनही कसोटी सामने खेळू शकणार नाही.

ओलिवरनं दक्षिण आफ्रिकासाठी 2017 पाच कसोटी सामने खेळला आहे. तर नगीदीनं मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यातून आतंरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. पण दोनही फॉर्मेटमध्ये तो अजूनही खेळलेला नाही.

दरम्यान, भारत आणि द. आफ्रिकेतील दुसरी कसोटी शनिवारपासून सेंचुरियनवर सुरु होणार आहे.

दक्षिण अफ्रीका टीम:

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, टेम्बा बावुमा, थ्युनिस डे ब्रूयेन, डी कॉक (विकेटकीपर), ए बी डिविलियर्स, डीन एल्गर, केशव महाराज, एडन मकरम, मॉर्ने मोर्केल, क्रिस मोरिस, एंडिले पेलक्वायो, वेर्नोन फिलेंडर, रबाडा, नगीदी, डुआने ओलिवर