दक्षिण आफ्रिकेनं चार दिवसांच्या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा अवघ्या दोन दिवसांत एक डाव आणि १२० धावांनी धुव्वा उडवला.

हा सामना सेंट जॉर्जेस पार्क स्टेडियमवर दिवसरात्र खेळवण्यात आला.

या सामन्यात झिम्बाब्वेसमोर डावाचा मारा चुकवण्यासाठी २४१ धावांचं आव्हान होतं. पण डावखुरा स्पिनर केशव महाराजनं ५९ धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून झिम्बाब्वेचा दुसरा डाव अवघ्या १२१ धावांत गुंडाळला.

अँडिल फेलुकवायोनं तीन विकेट्स काढून त्याला छान साथ दिली. त्याआधी, मॉर्ने मॉर्कलनं २१ धावांत पाच फलंदाजांना बाद करून झिम्बाब्वेचा पहिल्या डावात ६८ धावांत खुर्दा उडवला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने एडन मरक्रमच्या 125 धावा, डिव्हिलियर्स 53 आणि बवुमाच्या 44 धावांच्या जोरावर पहिला डाव 9 बाद 309 धावांवर घोषित केला होता.

यानंतर आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पहिला डाव 68 धावांत गुंडाळला. मग पुन्हा फलंदाजीसाठी उतरलेला झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या डावातही 121 धावाच करु शकला.