Solapur: पैलवान डोपिंगच्या मोहात? कुस्ती जिंकण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर? महाराष्ट्र केसरीतही डोपिंगची कीड? हे प्रश्न विचारण्याचं कारण आहे. सोलापुरात झालेली कारवाई.. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशातच सोलापुरच्या अन्न आणि औषध प्रशासनाने माळशिरस तालुक्यातील तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई केलीय. सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठी कारवाई केलीय. मेफेन टरमाईन या औषधाची अवैधपणे विक्री केल्याने माळशिरस तालुक्यातील तीन औषधविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. हे विना डॅाक्टर परवानगी विकलेले मेफेन टरमाईन हे पैलवानांना विकल्याचं समोर येतेय. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई पाहता कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्टॅ केसरी पर्यंत पोहोचली काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
कारवाईत पुढे आलेलं मेफेन टरमाईनची किमंत ३०० रुपये आहे..पण, काही मेडिकल्समध्ये दीड हजार रुपयांना हे इंजेक्शन विकलं जातंय. दरम्यान पोलिसात दाखल झालेल्या एफआयआरनुसार..हे सर्व इंजेक्शन तालमीत कुस्ती करणाऱ्या पैलवानांना विकण्यात आले आहेत. त्यामुळे पैलवान डोपिंगच्या मोहात आहेत का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
आता एकट्या माळशिरसमधून त्याचा काळाबाजार झाला असेल.. ते ही बघा..किती औषधांची झाली विक्री?
दीपक मेडिकल्स एन्ड जनरल स्टोअर्स - ७४०४ वायल्स
ओमसाई मेडिकल्स एन्ड जनरल स्टोअर्स - ५८३ वायल्स
राजलक्ष्मी मेडिकल्स एन्ड जनरल स्टोअर्स - १०७ वायल्स
सोलापुरच्या अन्न आणि औषध प्रशसनाने 5 डिसेंबर 2022 माळशिरस तालुक्यातील या तीन ही मेडिकल्सची तपासणी केली. अवैध पद्धतीने मेफेन टरमाईन विकल्याने या औषध विक्रेत्यांना खुलासा सादर करण्याच्या नोटीस देण्यात आल्या. विक्रेत्यांकडून आलेला खुलासा असमाधानकारक असल्याने 21 डिसेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यानंतर 30 डिसेंबर 2022 रोजी या तीन ही मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र औषध विक्रेत्यांनी आपल्या खुलाशात पैलवांनाना हे औषध विकल्याचे सांगितलय.
रक्तदाब वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या इंजेक्शनचा वापर पैलवान का करत असतील..तर त्याच्या शरीरावर कोणता परिणाम होतो... तर तेही बघा..इंजेक्शन घेतल्याने रक्तदाब वाढतो. परिणामी कुस्तीसाठी दम वाढतो. शरीर दणकट होते. अतिरिक्त ताकद येते, मनात असलेली भिती कमी होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंजेक्शन घेतल्याने स्पर्धेत यश मिळतेच ही मानसिकता तयार झालीय. पण, त्याचे दुष्परिणामही आहेत..
कुस्ती म्हणजे तांबड्या मातीतला रांगडा खेळ...पण, आज याच खेळाला डोपिंगची कीड लागलीय..आणि हीच कीड महाराष्ट्र केसरीपर्यंतही पोहोचल्याचा दावा केला जातोय. खरंतर कुस्ती हा मेहनतीचा खेळ..जुने पैलवान अंगमेहनतसह तितका सराव करायचे. पण, काळ बदलला.. आणि पैलवानही..आणि त्याच बदतल्या काळात डोपिंगची कीड कुस्तीच्या आखाड्यात पोहोचली..त्यामुळे प्रत्येक कुस्ती सामन्याआधी डोपिंग चाचणीची मागणी होतेय. सध्या माळशिरसमधल्या तीनही मेडिकल्सवर कारवाई झालीय.
पण, प्रकरण काही इतक्यावर संपेल असं नाहीय. कारण, जे माळशिसरमध्ये झालं..ते राज्याच्या प्रत्येक शहरांमध्ये होवू शकतं..त्यामुळे कुस्तीची प्रतिष्ठा तर धुळीस मिळतेय.. पण, पैलवानांचंही आयुष्य बरबाद होण्य़ाची भीती असते..आता सत्ताधारी यावर कोणता डावपेच आखणार,..आणि डोपिंगच्या किडीला चितपट करणार..हे पहावं लागेल..