Smriti Mandhana: टीम इंडियाची उपकॅप्टन स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलच्या विवाहसोहळ्यात रविवारी (23 नोव्हेंबर) अनपेक्षित वळण घेतले. वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर स्मृतीने जागेवर लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला. ही माहिती स्मृतीचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिली. यानंतर पलाशची सुद्धा पित्ताचा त्रास वाढल्याने त्याला सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तो हाॅटेलकडे गेला. दरम्यान, स्मृतीचे वडिल श्रीनिवास यांच्यावर सांगलीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगलीतील समडोळी रोडवरील मानधना फार्महाऊसमध्ये मेहंदी आणि संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. लग्नविधी रविवारी दुपारी सुरू होणार होता. परंतु, त्यापूर्वी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना अचानक आजारी पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. तिच्या संगीत समारंभातील एक व्हिडिओ, ज्यामध्ये स्मृतीने पलाश मुच्छलसाठी खास नृत्य केले होते. तिच्या नृत्याने केवळ कुटुंब आणि पाहुण्यांनाच नव्हे तर चाहत्यांनाही आश्चर्यचकित केले.

Continues below advertisement


कुटुंब, मित्र आणि क्रिकेटपटू देखील उपस्थित 


दोन्ही कुटुंबांचे सदस्य, जवळचे मित्र आणि स्मृतीचे टीम इंडियाचे सहकारी लग्नाला उपस्थित होते. सांगलीमध्ये तयार केलेल्या खास लग्नस्थळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्मृती आणि पलाशच्या लग्नाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.


पलाश आणि स्मृती 2019 मध्ये भेटले


स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 2019 मध्ये भेटले. त्यांची भेट मुंबईत एका मित्रामार्फत झाली. त्यांची मैत्री प्रेमात फुलली. त्यांनी शांतपणे त्यांचे नाते पुढे चालू ठेवले. जवळजवळ पाच वर्षांनंतर, 2024 मध्ये, त्यांनी नात्याची घोषणा केली. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, ते अखेर लग्नबंधनात अडकणार होते.






पलाशने लग्नापूर्वी स्मृतीला अशा प्रकारे प्रपोज केले


पलाशने स्मृतीला अतिशय खास पद्धतीने प्रपोज केले. तो स्मृतीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये घेऊन गेला, जिथे स्मृतीने अलीकडेच भारतीय महिला संघाचे विश्वचषक ट्रॉफीसाठी नेतृत्व केले आणि प्रपोज केले. पलाशने स्मृतीच्या आद्याक्षरांचा आणि जर्सी नंबर 'SM18' चा टॅटू देखील त्याच्या हातावर काढला, जो त्यांच्यातील प्रेमाचे दर्शन घडवतो.






पलाश एकल पलकचा धाकटा भाऊ 


पलाश मुच्छल हे संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. तो "प्रेम रतन धन पायो" गायिका पलक मुच्छलचा धाकटा भाऊ आहे. संगीत कुटुंबातून आलेल्या पलाशने 2014 मध्ये "ढिशकियां" या चित्रपटातून पदार्पण केले. त्याने भूतनाथ रिटर्न्समधील "पार्टी तो बनती है" आणि "तू ही है आशिकी" सारख्या सुपरहिट गाण्यांसाठी संगीत दिले.


पलाश मुच्छलची एकूण संपत्ती किती आहे?


पलाशने खूप लहान वयातच बॉलिवूडमध्ये एक मजबूत कारकीर्द घडवली आहे. त्याची एकूण संपत्ती 20 ते 41 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. संगीत रचनांव्यतिरिक्त, ते चित्रपट प्रकल्प आणि लाईव्ह शोमधून पैसे कमवतात. त्यांची आणि स्मृती मानधनाची एकत्रित एकूण संपत्ती सुमारे 50 ते 75 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.


इतर महत्वाच्या बातम्या