Smriti Mandhana Palash Muchhal Wedding :  भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal ) यांचा विवाह सोहळा रविवारी सांगलीत पार पडणार होता. मात्र आनंदाच्या या क्षणी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर स्मृती मानधना-पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, स्मृतीच्या वडिलांची तब्बेत बिघल्यानंतर पलाश मुच्छल याचीही प्रकृती बिघडली आहे. 

Continues below advertisement

व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याने पलाशला त्रास

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्यांच्यानंतर पलाश मुच्छल याचीही प्रकृती बिघडली आहे. यानंतर पलाशला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो हॉटलेवर रवाना झाला आहे. व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याने पलाशने उपचार घेतल्याचं सांगण्यात आले आहे. 

लग्नसोहळा पुढे ढकलला, कुटुंबाकडून माहिती

आता स्मृती मानधना हिचा रविवारी होणारा विवाह सोहळा अखेर पुढे ढकलण्यात आला आहे. मानधना यांच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. सकाळी अचानकपणे स्मृती मानधना यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत.

Continues below advertisement

जोपर्यंत वडिलांची तब्येत पूर्णपणे स्थिर होत नाही, तोपर्यंत लग्नाचा कार्यक्रम पुढे

कुटुंबाने सांगितले की, “जोपर्यंत वडिलांची तब्येत पूर्णपणे स्थिर होत नाही, तोपर्यंत लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” पलाश मुच्छल आणि मानधना कुटुंबीयांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन एकमताने हा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली आहे की, स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत अफवा न पसरवता त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू गेल्या दोन दिवसांपासूनच सांगलीमध्ये आल्या होत्या. आज लग्नाचा मुख्य सोहळा दुपारी चार वाजता होणार होता. या विवाह सोहळ्याला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील अशी माहिती पोलिसांच्या कडून देण्यात आली होती. मात्र आता स्मृती मानधना हिचा आजचा विवाह सोहळा अखेर पुढे ढकलण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Postponed : स्मृती मानधना-पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलला; प्रकृती बिघडल्याने स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया